Home Uncategorized श्री.अंबाई.सह. दूध संस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..सभासदांना दिवाळी बोनस 13% फरक जाहीर..

श्री.अंबाई.सह. दूध संस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..सभासदांना दिवाळी बोनस 13% फरक जाहीर..

4 second read
0
0
25

राधानगरी/प्रतिनिधी-मिलिंद कांबळे

राधानगरी येथील श्री अंबाई सह. दूध संस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या इमारतीत चेअरमन विजय बोंबाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेदरम्यान,संस्थेने सभासदांना दिवाळी बोनस म्हणून 13% फरक वाटप जाहीर केला.
सभासदांच्या मयत जनावरांना मयतपर प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे असे ठरले.
यावेळी दूध उत्पादक सभासदांच्या म्हैस दूध उत्पादकांना बक्षीस देण्यात आले.यामध्ये प्रथम क्रमांक सुनील सरवडेकर,द्वितीय क्रमांक रमेश तायशेटे, तृतीय क्रमांक शिवाजी फक्के तर गाय दूध उत्पादकामध्ये प्रथम क्रमांक विश्वास पाटील, द्वितीय क्रमांक राजेंद्र कांबळे (टेलर) तृतीय क्रमांक मिथुन जाधव यांना बक्षीसे देण्यात आली
कार्यक्रमास संस्थेचे संचालक विश्वास पाटील,संजय माळकर,मारुती पाटील,राजेंद्र कांबळे,सुरेश सावत,रमेश चांदम,संजय चव्हाण, संग्राम पाटील तसेच संस्थेचे उत्पादक सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…