Home Uncategorized शिरोळमध्ये पर्यावरण पूरक गणेश विसर्जनला बळदिवसभरात १६७३ मूर्तींचे दान

शिरोळमध्ये पर्यावरण पूरक गणेश विसर्जनला बळदिवसभरात १६७३ मूर्तींचे दान

3 second read
0
0
69

शिरोळ : कुणाल कांबळे
माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अंतर्गत शिरोळ नगरपरिषद शिरोळ व श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या विद्यमानाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेबाबत मुख्याधिकारी आणि प्रशासक निशिकांत प्रचंडराव, श्री दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव आप्पासाहेब पाटील तसेच दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांच्या आव्हानाला शिरोळ शहरातील नागरिकांकडून गुरुवारी पर्यावरण पूरक गणपती विसर्जनात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
गणेश मूर्तीची विसर्जन नदी, तलाव, विहिरीमध्ये न करता शिरोळ नगरपरिषद शिरोळ व श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या विद्यमानामार्फत तयार करण्यात आलेल्या कुंडामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करून पाणी प्रदूषण टाळावे व त्यांना मूर्ती दान करावयाची आहे त्यांनी दान करावी, असे आवाहन केले होते. त्यासाठी नगर परिषदेकडून शहरांमध्ये गणेशनगर, विजयसिंह नगर, पंचगंगा घाट या ठिकाणी गणेश मूर्ती व निर्माल्य स्वीकारणे पथके तयार केली होती. तरी या सर्व ठिकाणी नागरिकांकडून १६७३ मूर्ती दान करण्यात आल्या. तसेच दिवसभरात चार्ट निर्माण परिषदेने संकलन केले आहे. या कामी नगर परिषदेने पतके तयार करून सर्व खात्याचे अधिकारी कर्मचारी नेमले होते.
यावेळी चंद्रकांत पाटील, साहिल मकानदार, विजय मुळीक, संदीप चुडमुंगे, मल्लिकार्जुन बल्लारी, विनायक लोंढे, प्रशांत आवळे, विनोद बिराने, मलिक बल्लारी, सचिन सावंत, पोपट आदके, विश्वास कर्नाळे व नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी व कंत्राटी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…