Home Kolhapur कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका

कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका

3 second read
0
0
462

२०एप्रिल २०२४

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापूरत सध्या मिसळ पे चर्चा हा कार्यक्रम जोरदारपणे सुरू आहे. निवडणुकीच्या कालावधीत अधिकाधिक मतदारांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार व समर्थक वेगवेगळी शक्कल लढवतात. रोज वेगवेगळ्या भागात मिसळ पे चर्चा आयोजित करून मतदारांच्यापर्यंत उमेदवाराचे चिन्ह पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे.

लक्ष्मीपुरी मंडळातील उद्यमनगर, यादवनगर, गुजरी येथील कासार गल्ली या ठिकाणी मिसळ पे चर्चा आणि नमो संवाद हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, सत्यजित कदम, अजित ठाणेकर, गायत्री राऊत, संगीता खाडे,विशाल शिराळकर, संतोष लाड, कुलदीप गायकवाड, संदीप कुंभार, गिरीश साळोखे, मंगला निपाणीकर, तौफिक बागवान, संदीप व्हडगे, अवधूत भाटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…