
भारतीय जनता पक्षाचे सरकार
केंद्रात आणण्याचे आता जनतेनेच ठरविले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही त्रिमूर्ती जो उमेदवार देईल तो निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी अहो रात्र मेहनत करा. व झटून कामाला लागावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रविश उदयसिंग पाटील- कौलवकर यांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला. यानिमित्त आयोजित शेतकरी व युवक मेळाव्यात ते बोलत होते. रविश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना प्रवेशा देऊन स्वागत केले. रविश पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदाची घोषणा केली. यावेळी खा. धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे यांची भाषणे झाली. स्वागत डॉ. सुभाष जाधव यांनी केले. प्रास्ताविक नाथाजी पाटील यांनी केले. कार्यक्रमास भरमू सुबराव पाटील, ऋतुजा रविश पाटील, विलास रणदिवे, सौ. सविता पाटील, धीरज करलकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोल्हापुरी कारभार साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे


