Home Uncategorized एम.आय.टी.राष्ट्रीय सरपंच संसद मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न…

एम.आय.टी.राष्ट्रीय सरपंच संसद मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न…

3 second read
0
0
445

कोल्हापूर मध्ये आज एम. आय. टी. राष्ट्रीय सरपंच संसदचे आज टाकाळा येथील, जिल्हा परिषद सोसायटीच्या हॉल मध्ये पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग विभाग भारत सरकारचे अधिकारी मा.यशोवर्धन बारामतीकर हे उपस्थित होते.

या वेळी त्यांनी बायोगॅस व व्यसन मुक्ती, कृषी विषयक माहिती, महिला बचत गटांच्या कामाची माहिती घेणे, प्रत्येक गावाचे कृती आराखडा तयार करणे, आदी योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच राष्ट्रीय सरपंच संसदचे प्रमुख समन्वयक मा.योगेश पाटील यांनी एम. आय. टी. च्या महाराष्ट्रच्या पातळीवर चाललेल्या कामाची संपूर्ण माहिती, त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने सर्वांना दिली.

तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला समन्वयक भक्ती जाधव यांनी एम. आय. टी. ने कोल्हापूर जिल्हातील 12 तालुके दत्तक घेतले आहे, तेथे काय काय काम चालू आहे यांची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला सह समन्वयक प्रकाशराव महाले, पुणे विभाग अध्यक्ष रवींद्र पाटील, कोल्हापूर जिल्हा महिला समन्वयक बिना देशमुख, सह समन्वयक रिमा पाटील , सुमन पाटील, तसेच कोल्हापूर जिल्हा महिला संघटक सुप्रिया शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…