Home Uncategorized भाजपा जिल्हा कार्यालयात आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न….

भाजपा जिल्हा कार्यालयात आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न….

8 second read
0
0
141

कोल्हापूर : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिलांसाठी मोफत स्त्रीरोग तपासणी शिबीर उत्साहात संपन्न झाले. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजन करून या शिबिराची सुरवात करण्यात आली.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, प्र.का.सदस्य राहूल चिकोडे, सरचिटणीस डॉ राजवर्धन, गायत्री राउत, संगीता खाडे, डॉ.शिवानंद पाटील, डॉ.कौस्तुभ वाईकर, डॉ सचिन चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराच्या सुरवातीला भाजपा वैद्यकीय आघाडीच्यावतीने डॉक्टर क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ.राधिका नंदकुमार जोशी, डॉ. मंजुश्री श्रीनिवास रोहिदास, डॉ. मधुरा मिलिंद कुलकर्णी, डॉ. स्वाती हरिश नांगरे, डॉ. अश्विनी बाळासाहेब माळकर, डॉ.वहिदा दिलखुश तांबोळी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना डॉ राधिका नंदकुमार जोशी म्हणाल्या, आपल्या आपल्या समाजिक, राजकीय जीवनामध्ये आरोग्य सेवा हि आपली जबाबदारी म्हणून समाजासाठी कार्यरत राहिले पाहिजे. तसेच गर्भाशयाचा कॅन्सर ही सध्याची गंभीर समस्या असून हि समस्या दूर करण्यासाठी जास्तीत जाता माता-भगिनींसाठी लसीकरण स्वरुपात आपली जबाबदारी पूर्ण करावी असे आवाहन केले.

जिल्हा कार्यालय तसेच भाजपाच्या सात मंडलांमध्ये अशा प्रकारची आरोग्य शिबिरे सातत्याने आयोजित करणार असल्याचे याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगीतले.आजच्या या शिबिरात रक्त तपासणीच्या HB, CBC, RFT, LFT, कॅल्शीयम, थायरॉईड इत्यादी विविध तपासण्यांचा तसेच तज्ञ डॉक्टरांकडून स्त्रीरोग, अस्थिरोग, मेंदू व मणक्याचे आजार, मधुमेह, हृदयरोग, पोटाचे आजार, त्वचा विकार, कान-नाक-घसा, केसांचे विकार, दातांचे विकार अशा सर्व आजारांची तपासणी अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, डेंटल, फ़िजिओथेरपींचे डॉक्टरांकडून करण्यात आली.

यावेळी जवळपास २३० महिलांनी शिबिरास भेट देऊन आरोग्य तपासणी करूण घेतली. याप्रसंगी विजय आगरवाल, सुधीर हराळे, संतोष माळी, सुभाष माळी, सनी आवळे, प्रवीणचंद्र शिंदे, शशिकांत रणवरे, डॉ.आनंद गुरव, डॉ.श्वेता गायकवाड, अश्विनी गोपुगडे, तेजस्विनी पार्टे, कोमल देसाई, समयश्री अय्यर, सुष्मिता प्रभूदेसाई, डॉ.श्रीकांत सागावकर, डॉ. अवधूत देशपांडे, डॉ.नितीन लंगरे, डॉ.बालाजी पोवार, डॉ.विजय बांगर, दयानंद कोनकेरी आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते शिबिरासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…