Home Uncategorized श्री प्रतीक तानाजी गौड यांना लोकरत्न भारत भूषण पुरस्कार..

श्री प्रतीक तानाजी गौड यांना लोकरत्न भारत भूषण पुरस्कार..

3 second read
0
0
74

इचलकरंजी येथील निती आयोग भारत सरकार संलग्न वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या मार्फत देण्यात येणारा 2024 या वर्षाचा ‘लोकरत्न भारत भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार राधानगरी पंचायत समितीचे अभियंता श्री. प्रतीक तानाजी गौड रा. उंदरवाडी ता. कागल यांना प्रदान करण्यात आला.

प्रतीक गौड यांचे सामाजिक क्षेत्रातील विधायक योगदान व सामाजिक कार्य करण्याची तळमळ पाहून त्यांना हा पुरस्कार या संस्थेचे अध्यक्ष श्री विजय तोडकर यांच्या हस्ते पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमास माजी खासदार राजू शेट्टी साहेब, जयसिंगपूर शहराचे पोलीस निरीक्षक श्री.सत्यवान हाके, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक श्री.राजीव पाटील, प्रसिद्ध व्याख्याते प्रथमेश इंदुलकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.विजय तोडकर इ. प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सरवडे प्रतिनिधी : प्रा. अमोल कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…