Home वायरल महाराष्ट्र मध्ये प्रथमच तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी

महाराष्ट्र मध्ये प्रथमच तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी

3 second read
0
0
79

हुपरी येथील वयाच्या बाराव्या वर्षापासून तृतीयपंथी असलेल्या नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर आज ‘देव आई’ म्हणून प्रसिध्द असणाऱ्या तातोबा बाबूराव हांडे यांची निवड करण्यात आली. एका तृतीयपंथीयाला या पदावर संधी देण्याची या महाराष्ट्रातील ऐतिहासिक आहे. ताराराणी आघाडीने त्यांना संधी दिली आहे. आज हुपरी नगरपालिका आवारात गुलाल व भंडारा उधळून जल्लोष करण्यात आला या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. आमदार प्रकाश आवाडे व जि.प. सदस्य राहुल आवाडे यांनी संधी दिली आहे. तृतीयपंथीय लोकांना शासनाच्या विविध योजना राबण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्वीकृत नगरसेवक तातोबा हांडे यावेळी बोलत होते. 2017 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 3 मध्ये हांडे यानी भरलेला अर्ज त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरविला होता.

या निवडीबाबत आपण समाधानी असून संपूर्ण राज्यात एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील तृतीयपंथीयाला संधी देण्याचे काम ताराराणी आघाडीने केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिल्याचे जि. प. सदस्य राहुल आवाडे यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली

.यावेळी हुपरी गावचे नगराध्यक्षा जयश्री गाट, जि प सदस्य राहुल आवाडे, उपनगराध्यक्ष सुप्रिया पालकर, ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद सुरज बेडगे , जयकुमार माळगे,भरतराव लठ्ठे,भाजपचे पक्षप्रतोद रफिक मुल्ला, शिवसेनेचे पक्षप्रतोद बाळासाहेब मुधाळे नगरसेवक संदीप वाईंगडे सपना नलवडे, नगरसेवक पूनम पाटील, ऋतुजा गोंधळी, माया रावण, सामाजिक कार्यकर्ते, नगरपरिषदेच्या अधिकारी, नागरिक आदी उपस्थित होते. कोल्हापुरी कारभार साठी हुपरी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…