Home Uncategorized ‘गोकुळ’ने नेहमीच दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधली.. -डॉ. संजय डी.पाटील (अध्यक्ष –डॉ.डी.वाय.पाटील ग्रुप )

‘गोकुळ’ने नेहमीच दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधली.. -डॉ. संजय डी.पाटील (अध्यक्ष –डॉ.डी.वाय.पाटील ग्रुप )

11 second read
0
0
74

कोल्हापूर: ता २८: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे रविवार दि.२८/०१/२०२४ इ.रोजी डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील यांनी सदिच्‍छा भेट दिली. त्यावेळी गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व सर्व संचालकाच्या उपस्थितीत गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्‍यात आला.

यावेळी बोलताना डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील म्हणाले कि गोकुळने अत्याधुनिक पद्धतीने दूध उत्पादन प्रकिया राबवून दुधाची व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता जपली आहे. गोकुळ म्हणजे गुणवत्ता असे जे समीकरण तयार झाले आहे, त्याचे खरे श्रेय हे दूध उत्पादकांना आहे. गोकुळने नेहमीच दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधलेली आहे. भविष्यात तरुण वर्गाने दुग्ध व पशुसंवर्धन व्यवसाया संबंधीचे तंत्रशुद्ध शिक्षण घ्यावे व दुग्ध व्यवसाय वाढवावा असे मनोगत व्यक्त केले .

यावेळी डॉ.संजय डी.पाटील व त्यांच्या सोबत आलेल्या मान्यवरांनी संघाची दूध उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्षपणे अनुभवली व विस्तारित प्रकल्पाची प्रशंसा केली तसेच कामकाजाची माहिती घेऊन कामकाजाचे कौतुक केले. यावेळी गोकुळच्या दर्जेदार उत्पादनांचा हि आस्वाद त्यांनी घेतला व गोकुळच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी संघाचे संचालक अजित नरके, प्रा.डॉ.के.प्रतापन यांनी मनोगत व्यक्त केली.व आभार शशिकांत पाटील-चुयेकर यांनी मानले. यावेळी डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, डॉ.डी.वाय.पाटील अॅग्रीकल्चर व टेक्नीकल युनिव्हर्सिटी तळसंदे उपकुलपती प्रा.डॉ.के.प्रतापन, प्रताप महाले(पुणे), गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील, बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील (चुयेकर), कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, चेतन नरके, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, सहा.महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, सुधाकर पाटील, उदय पाटील, व संघाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…