Home Uncategorized दूध वाढीसाठी जनावरांचे योग्य संगोपन, आहार व दुधाची गुणवत्ता या त्रिसूत्रीचा प्रभावीपणे अंमल करावा – नविद मुश्रीफ (संचालक गोकुळ दूध संघ)

दूध वाढीसाठी जनावरांचे योग्य संगोपन, आहार व दुधाची गुणवत्ता या त्रिसूत्रीचा प्रभावीपणे अंमल करावा – नविद मुश्रीफ (संचालक गोकुळ दूध संघ)

3 second read
0
0
814

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत दत्त सहकारी दूध संस्था मळगे खुर्द व श्रीराम सहकारी दूध संस्था मळगे खुर्द ता.कागल या संस्थेच्या दूध उत्पादकांनी के.डी.सी.सी. बँक व विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या ५० म्हैशी हरियाणा येथून खरेदी केलेल्या म्हैशींचे मळगे बुद्रुक ता.कागल येथे गोकुळचे संचालक मा. नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पूजन करून या म्हैशी दूध उत्पादकांना प्रदान करण्यात आल्या.

यावेळी बोलताना संघाचे संचालक नविद मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळ दूध संघाने २०लाख लीटर संकलनाचे उदिष्ट ठेवले असून यासाठी गोकुळमार्फत दूधवाढ़ कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. याला दूध उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. म्हैस दूध वाढीसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन दुध उत्पादकांना मार्गदर्शन, प्रोत्साहन देण्याकरिता गोकुळमार्फत गोठा भेट कार्यक्रम हाती घेतला असून तो मोठ्या प्रमाणात संघाकडून राबविण्यात येत आहे. दूध उत्पादकांनी जनावरांचे उत्तमरित्या संगोपन, योग्य आहार व दुधाची गुणवत्ता वाढ या त्रिसूत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून दूध वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी केले.

यावेळी संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांनी बाबुराव पाटील, शंकर देवेकर, भैरवनाथ पाटील, विष्णू पालकर, तेजश पाटील,सचिन पाटील, विनायक पाटील, दत्ता देवकर या दूध उत्पादकांच्या गोठ्यास भेट दिली.

याप्रसंगी संघाचे संचालक नविद मुश्रीफ, सुभाष चौगुले, पी एस पाटील, शिवाजी पाटील, भैरवनाथ पाटील, तानाजी पाटील, अमर पाटील, संदीप पाटील, बंडा गुरव, विजय पाटील गोकुळचे अधिकारी चंद्रशेखर घाळी, श्री लाडगावकर, रणजीत शिंदे तसेच गावातील सर्व दूध संस्थांचे पदाधिकारी व दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…