Home Uncategorized गोकुळच्या दूध उत्पादकांची शून्य शिल्लकेवर खाती उघडून देण्याची गोकुळची मागणी जिल्हा बँकेकडून मान्य – अरुण डोंगळे

गोकुळच्या दूध उत्पादकांची शून्य शिल्लकेवर खाती उघडून देण्याची गोकुळची मागणी जिल्हा बँकेकडून मान्य – अरुण डोंगळे

3 second read
0
0
609

कोल्हापूर : राज्य शासनाने सहकारी दूध संस्थामार्फत गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यासाठी उत्पादकांची बँकेत खाती असणे अनिवार्य केले असून ज्या दुध उत्पादकांची बँक खाती नाहीत अश्या उत्पादकांची शून्य शिल्लक रक्कमेवर के.डी.सी.सी.बँकेने खाती उघडून द्यावीत ही गोकुळने बँकेला केलेली विनंती मान्य केल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली.

गाय दूध उत्पादकांची दर दहा दिवसाची दूध बिले दूधसंस्थांनी रोख देण्याऐवजी त्यांच्या बँक खात्यावर जमा करणे हे प्रतिलिटर पाच रुपये अनुदानासाठी बंधनकारक असल्याची अट शासनाच्या दुग्ध विकास विभागाने घातलेली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना बँकेत खाते उघडावे लागणार आहे. जिल्हा बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी एक हजार रुपये अनामत भरावी लागते.

गोकुळच्या दूध उत्पादकांची बँक खाती शून्य शिल्लकेवर उघडून देण्याची मागणी गोकुळच्यावतीने के.डी.सी.सी.बँकेकडे केली होती. बँकेचे दूध संस्था गटाचे संचालक यशवंत उर्फ भैय्या माने यांनी या मागणीची दखल घेऊन बँकेचे चेअरमन मा. नामदार मुश्रीफसो आणि कार्यकारी व्यवस्थापक जी.एम. शिंदे यांच्याकडून ही मागणी मान्य केली करून दिली आहे.गोकुळच्या जिल्ह्यातील दूध संस्थांच्या दूध उत्पादकांनी जिल्हा बँकेच्या नजीकच्या शाखेत शून्य शिल्लकेवर आपले बँक खाते उघडून द्यावी जेणेकरून शासनाचे प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा लाभ घेता येईल असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…