Home Uncategorized कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी ना हरकत दाखला त्वरित द्यावा – माजी आमदार अमल महाडिक यांची महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे मागणी

कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी ना हरकत दाखला त्वरित द्यावा – माजी आमदार अमल महाडिक यांची महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे मागणी

3 second read
0
0
233

कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे हे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत अशा आशयाची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी मा.नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम उपस्थित होते. सदर रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला महानगरपालिकेकडून विनाविलंब मिळावा अशा आशयाचे पत्र त्यांनी आयुक्तांना सादर केले. आयुक्तांनी सकारात्मकता दाखवत लवकरच ना हरकत दाखला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला जाईल असे आश्वासन दिले. या हस्तांतरणामुळे कोल्हापूर महानगरपालिकेवर सदर रस्त्यांच्या डागडूजीपोटी पडणारा मोठा आर्थिक भार हलका होणार असून भाविक आणि नागरिकांचीही सोय होणार आहे.लवकरच कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांची अवस्था सुधारेल अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…