Home Uncategorized संभाव्य दुष्काळाचे सावट ओळखून जिल्हा प्रशासनाने जलयुक्त शिवार योजनेची कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी – माजी आमदार अमल महाडिक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

संभाव्य दुष्काळाचे सावट ओळखून जिल्हा प्रशासनाने जलयुक्त शिवार योजनेची कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी – माजी आमदार अमल महाडिक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

3 second read
0
0
277

राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. जलसंपन्न असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यालाही दुष्काळाची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. राजाराम कारखान्याने गतवर्षी राबवलेले ओढा पुनरुज्जीवनासारखे कार्यक्रम जिल्हाभर राबवावेत. जलयुक्त शिवार योजनेतून ठिकठिकाणी जलसंधारणाची कामे करावीत अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे पत्राद्वारे केली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत महाडिक यांनी जलसंधारणासाठी विशेष प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी सूचना केली. राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदायी असून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास दुष्काळाचा सामना निश्चित करता येईल. शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास टंचाई जाणवणार नाही असेही महाडिक म्हणाले. जिल्हाधिकारी रेखावार यांनी, शासनाकडे प्रस्ताव सादर करून निश्चितच योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन अमल महाडिक यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…