Home Uncategorized लाडवाडी येथील आ. शि. नवणे (अण्णा) दूध संस्था दिवाळी बोनस देण्यात राधानगरी तालुक्यात भारी.

लाडवाडी येथील आ. शि. नवणे (अण्णा) दूध संस्था दिवाळी बोनस देण्यात राधानगरी तालुक्यात भारी.

4 second read
0
0
543

राशिवडे प्रतिनिधी :- कृष्णा लाड.

एकीकडे महागाईच्या काळात सहकारी दूध संस्था चालवणे मुश्किल होत आहेत. तर दुसरीकडे मात्र, राधानगरी तालुक्यातील लाडवाडी येथील कै. आण्णासाहेब नवणे या दूध संस्थेने तालुक्यात दूध बोनस देण्याची परंपरा अखंड राखली आहे. या संस्थेने म्हैस दुध उत्पादकांना प्रतिशेकडा २१ रुपये आणि गाय दुध उत्पादकांना प्रतिशेकडा १७ रुपयांचा दिवाळी बोनस दिला आहे.
यासंदर्भात संस्थेचे चेअरमन राजाराम सासमल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, दूध उत्पादकांची संस्थेला गुणवत्तापूर्वक दूध पुरवठा करण्याची धडपड, संचालक मंडळांनी सभासदांना विश्वासात घेऊन चालवलेला पारदर्शक कारभार, कामगारांची नियोजनबद्ध कार्यप्रणाली आणि त्यांना मिळालेल्या गोकुळच्या साथीमुळे सलग पाचव्या वर्षी दूध उत्पादकांना दिवाळी बोनस देण्यात यश आले आहे. संस्थेचा चेअरमन या नात्याने या चारही घटकांचा मी मनापासून आभारी असल्याचे सांगितले.
यावेळी गोकुळ चे वैरण विकास अधिकारी प्रकाश सासमल यांच्यासह संस्थेचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, सचिव राजाराम रेडेकर आणि सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…