Home Kolhapur निवडे येथे गणेश विकास सेवा संस्थेचे उदघाटन, विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडविणार

निवडे येथे गणेश विकास सेवा संस्थेचे उदघाटन, विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडविणार

3 second read
0
0
728

गगनबावडा/प्रतिनिधी, महादेव कांबळे

निवडे : येथे गणेश विविध कार्यकारी विकास सेवा संस्था किरवेच्या नवीन कार्यालयाच्या उदघाटन समारंभ प्रसंगी विलास पाटील, नंदकुमार पाटील, सर्जेराव खाडे, के.डी.कांबळे, रविंद्र पाटील, संदीप पाटील, दिपक पाटील व अन्य

गणेश विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वित्त पूरवठा करुन त्यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील यांनी केले.

निवडे (ता.गगनबावडा) येथे गणेश विविध कार्यकारी विकास सेवा संस्था किरवेच्या नवीन कार्यालयाच्या उदघाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. लोकनेते विकास संस्थेचे सचिव नंदकूमार पाटील व कोदे खोरी विकास संस्थेचे सचिव के.डी.कांबळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन कार्यालय कामकाजाचा शुभारंभ करण्यात आला. सहकारी संस्थां या शेतकरी बांधवांच्या आर्थिक विकासासाठी असून शेतकरी बांधवांनी आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून कर्जाची उचल करून सहकार चळवळ बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे असेही आवाहन विलास पाटील यांनी यावेळी बोलताना केले.

गगनबावडा विकास संस्थेचे सचिव रविंद्र पाटील, गगनगिरी पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय सूतार, दिपक पाटील, संदिप पाटील, एकनाथ पाटील, चंद्रकांत कांबळे, तानाजी व्होवळे, रुपेश सावंत, विनायक पाटील, केवल पाटील, दिपक पाटील, सिध्देश पाटील, रोहन कांबळे आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार सर्जेराव खाडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…