Home Kolhapur सतेज पाटील यांच्या नेतृत्वात उद्या जनसंवाद पदयात्रा

सतेज पाटील यांच्या नेतृत्वात उद्या जनसंवाद पदयात्रा

3 second read
0
0
785

हातकणंगले: कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. ही यात्रा हातकणंगले तालुक्यात रविवार (दि.१०)आगमन करत असून पदयात्रेचा मार्ग हेरले, माले फाटा, मुडशिंगी, चौकाक, अतिग्रे आहे. हातकणंगले येथे संवाद सभा होणार आहे.

या पदयात्रेत शहरातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार राजू आवळे यांनी केले. तसेच सरकारच्या दडपशाहीमुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढती महागाई, महिलांवर अत्याचार, शेती मालास भाव नाही, जातीय तेढ यांसारख्या कारणांमुळे जनतेच्या मनात सत्ताधाऱ्यांविषयी चीड आहे. ही चीड आणि भीती दूर करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यव्यापी जनसंवाद पदयात्रा सुरू आहे.

यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पदयात्रेत आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे आमदार पदाधिकारी सहभागी होणार असून, रविवारी सकाळी सात वाजता हेरले इथून पदयात्रेला सुरुवात होणार असून हातकणंगले येथील नेहरू चौक बाजारपेठेत संवाद सभेने पदयात्रेची सांगता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…