Home Uncategorized १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने कृतज्ञता मशाल मार्च

१५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने कृतज्ञता मशाल मार्च

4 second read
0
0
798

कोल्हापूर : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे. देशाच्या स्वतंत्रता लढ्यातील काँग्रेस पक्षाचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. काँग्रेस पक्षाचा हा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याबरोबरचं स्वातंत्र्य योद्धांच्या स्मरणार्थ १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृतज्ञता मशाल मार्च काढण्यात आली. रात्री 12 वाजता मिरजकर तिकटी येथून या कृतज्ञता मशाल मार्चला सुरुवात झाली. यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशाच्या स्वातंत्र्यांकरिता अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. तरुणांमध्ये राष्ट्रीयत्वाची ही भावना जागृत व्हावी, स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास लोकांसमोर यावा, स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचा सहभाग अधोरेखित व्हावा ह्या उद्देशाने “कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कृतज्ञता मशाल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मशाल मार्चला मिरजकर तिकटी येथून सुरुवात करण्यात आली.

रात्री 12 वाजता या मशाल प्रज्वलित करून या मार्चला सुरवात करण्यात आली. रात्री 12 वाजता देखील काँग्रेसचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने या मशाल मार्चमध्ये सहभागी झाले होते. मिरजकर तिकटी पासून सुरू झालेली, मशाल मार्चची सांगता दसरा चौक येथे करण्यात आली. याप्रसंगी भारत माता की जय, वंदे मातरम अशा या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. यावेळी बोलताना आमदार तसेच पाटील यांनी, स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर काँग्रेसचे विचार टिकवणे गरजेचे असल्याचे सांगितले. हा मशाल मार्च म्हणजे येणाऱ्या काळात परिवर्तनाची नांदी ठरेल असा विश्वास यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांचा मोदी सरकारला विसर पडल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली. या मशाल मार्च मध्ये आमदार ऋतुराज पाटील, सत्यजीत जाधव,काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, बाळासाहेब सरनाईक, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, सुरेश कु-हाडे, तौफीक मुल्लाणी, प्रवीण केसरकर, राहुल माने, संजय मोहीते, दुर्वास कदम, प्रकाश चौगले, रवि आवळे, संजय पवार- वाईकर हिंदूराव ठोंबरे, संध्या घोटणे, भारती पोवार, लिला धुमाळ, वैशाली महाडीक, हेमलता माने, पूजा आरडे, यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…