Home राजकारण ‘धाडसी क्रांती कांबळेचे गोकुळमार्फत कौतुक’

‘धाडसी क्रांती कांबळेचे गोकुळमार्फत कौतुक’

29 second read
0
0
419

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ ) यांच्या वतीने  कुमारी क्रांती सागर कांबळे (वय ११) (रा.कांचणवाडी तालुका करवीर) हिने तुळशी नदीमध्ये बुडणाऱ्या आपल्या तीन भावंडचे प्राण वाचवले या तिच्या धाडसा बद्दल तिचा सत्कार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते  जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे करण्‍यात आला.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले करवीर तालुक्यातील कांचनवाडी गावातील कुमारी क्रांती सागर कांबळे (वय११) हिने ६जून २०२३इ रोजी तुळशी नदीमध्ये बुडणाऱ्या आपल्या आराध्या, महेश्वरी व श्रावण या तीन भावंडांचे प्राण वाचवले, एवढ्या लहान वयात क्रांतीचे धाडस व समयसूचकता वाखाणण्‍याजोगे असून समाजातील विद्यार्थ्‍यानी   तिचा आदर्श घ्यावा.   यावेळी तिच्या  या धाडसा बद्दल सर्वांनी कौतुक केले. व पुढील शैक्षणिक वाटचालीस  शुभेच्छा दिल्या.

क्रांतीला प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून गोकुळमार्फत दहा हजार रुपयाची रक्कम देण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी जाहीर केले.

 यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे,माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील (चुयेकर ),बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके गोकुळचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ यू व्ही मोगले, डॉ, साळोखे, डॉ. प्रकाश दळवी जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच संग्राम मगदूम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…