Home राजकारण गोकुळ मध्ये पुन्हा अरुणोदय…

गोकुळ मध्ये पुन्हा अरुणोदय…

8 second read
0
0
76

आज गोकुळचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली.
अरुण डोंगळे हे गेले 35 वर्ष गोकुळचे संचालक आहेत. यापूर्वीही त्यांनी चेअरमनपद भूषविलेले आहे.
दोन वर्षांपूर्वीच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत निर्णायकी भूमिका घेणारे हे डोंगळेहोते .
आज त्यांना त्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून चेअरमनपदी बिनविरोध झालेली निवड सर्वच दूध उत्पादकांना सुखावून जाणारी आहे. त्यांच्या निवडीमुळे अमूल दूध , खाजगी दूध संस्था यांच्या स्पर्धेला सचोटीने तोंड देणारा चेअरमन गोकुळ दूधला मिळाला याचे दूध उत्पादकात व कार्यकर्त्यात समाधान दिसत होते .अरुण डोंगळे यांची खासियत म्हणजे त्यांचे सत्ताधारी गटातील संचालकांशी असणारे चांगले संबंध तसेच विरोधकांनाही सांभाळून घेऊन पुढे जाण्याची हातोटी .सर्व जिल्ह्याच्या राजकारणाची माहिती असल्यामुळे आणि सर्व गटातटांशी संपर्क असल्यामुळे त्यांची कारकीर्द यशस्वी होईल अशी कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे.

आ.पी एन पाटील,आ. हसन मुश्रीफ यांच्याशी चांगले संबंध आणि त्यांचा स्वतःचा असणारा थेट संपर्क त्यामुळे कार्यकर्त्यात उत्साहाला उधाण आलेले दिसत आहे त्यांच्या घोटवडे या मूळ गावी संध्याकाळी त्यांची जिप्सी गाडीतून भव्य मिरवणूक निघाली. सर्वसामान्य दूध उत्पादकात आणि गोकुळला नवचैतन्य आणून देण्यात अरुण डोंगळे यशस्वी होतील अशी तिथे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांची उत्पादकांची भावना होती आणि त्या भावना ते गुलाल उधळून अरुण डोंगळेंचे अभिनंदन करण्यात एकत्र झालेल्या संख्येवरून लक्षात येते. या चेअरमन पदाच्‍या निवडीकरीता सुचक म्‍हणून – श्री.विश्वासराव पाटील व अनुमोदक म्‍हणून – श्री.नविद मुश्रीफ होते.

यावेळी निवडणूक अधिकारी डॉ.महेश कदम विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध पुणे), संघाचे माजी चेअरमन विश्‍वास पाटील, अभिजीत तायशेटे,अजित नरके,नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खोडे, अंबरिषसिंह घाटगे,युवराज पाटील, मुरलीधर जाधव , श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…