Home Uncategorized दत्त सेवा विद्यालय तुरुकवाडी येथे महाराजस्व अभियान

दत्त सेवा विद्यालय तुरुकवाडी येथे महाराजस्व अभियान

3 second read
0
0
191

 दत्त सेवा विद्यालय तुरुकवाडी येथे महाराजस्व योजना अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी  महसूल विभाग शाहूवाडी अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनेमध्ये 2338 लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष लाभ घेतला. सर्वसामान्य जनता व शेतकरी यांची महसूल विभाग अंतर्गत व क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न तत्पर निकालात काढण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिक शेतकरी आणि शेत मजुरांना देण्यासाठी  महाराजास्वत अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी समाधान शिबिराचे आयोजन केले.
 यावेळी तहसील कार्यालय तर्फे सर्व प्रकारचे शासकीय प्रमाणपत्र, रेशन कार्ड दुबार, युनिट कमी जास्त, सातबारा, आठ अ वितरण ,आधार रजिस्ट्रेशन व दुरुस्ती, संजय गांधी योजना लाभार्थी मंजूर पत्र वाटप व नवीन अर्ज स्वीकारणे, अशा योजना राबवण्यात आल्या. यावेळी  एकात्मिक बालविकास, पशुवैद्यकीय विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पंचायत समिती, आरोग्य विभाग, उपअधीक्षक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पोस्ट ऑफिस; पाटबंधारे विभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग, वीज वितरण, भारत संचार, निगम दुय्यम निबंधक सहकारी संस्था, वन विभाग अशा विविध विभागातर्फे विविध योजना सर्वसामान्य जनतेसाठी राबविण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे उद्घघाटन जि.प.सदस्य हंबीरराव पाटील,यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार रवींद्र मोरे, डॉ. एच आर निरंकारी, कृषी अधिकारी अभिजीत जेदे,सेतु संचालक राजेंद्र डोंगरे, दत्तसेवेचे विश्वस्त डॉ बाळासाहेब पाटील, दिलीप पाटील (नाना), सरपंच संजय माईंगडे, सरपंच सौ वंदना ठोंबरे, मंडल अधिकारी मोहन जाधव यांच्या आदीसह भेडसगाव मंडल मधील सर्व तलाठी कोतवाल यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…