

कसाबा बावडा (ता.करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विक्रमी 91.12 टक्के मतदान झाल्याने निकालाबद्दलची हुरहुर कमालीची वाढली आहे. गत निवडणुकीत सरासरी 90 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे वाढलेला टक्का नक्की कोणाला फायदा करून देणार याची हुरहुर सर्वांनाच लागली आहे. ही निवडणूक केली वर्षभरापासून गाजते आहे. पण सभासदांच्या मतांचा कौल मात्र मंगळवारीच स्पष्ट होईल. सुरुवातीला राजाराम ची निवडणूक ही अपात्र सभासदांच्या लढ्यामुळे गाजली. त्याची लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. त्यानंतर विरोधी आघाडीचे तगडे उमेदवार अपात्र ठरण्यावरून गाजली. नंतर ती लढाई उच्च न्यायालयापर्यंत गेली. या दोन्ही लढ्यात सत्ताधारी महादेवराव महाडिक यांच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे आता प्रत्यक्ष मत पेटीतील लढाई कोणाच्या बाजूने कौल देते याबद्दल अंदाज वर्तवणे मुश्किल झाले आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.
जाहिरात
