Home राजकारण राजारामच्या निवडणुकीत कोरेंनी टाकला नवा ट्विस्ट

राजारामच्या निवडणुकीत कोरेंनी टाकला नवा ट्विस्ट

4 second read
0
0
655

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणांगणात पाटील महाडिक हे आमने-सामने असताना आता आमदार विनय कोरे यांनी देखील या रणांगणात थेट उडी घेतलीय.. विधान परिषद बिनविरोधच्या बदल्यात राजाराम सहकारी साखर कारखाना महाडिकांना सोडायचा अस विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी ठरलं होतं पण आता सतेज पाटील आपला शब्द पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे विनय कोरे यांच्या या विधानाने गौप्यस्फोट निर्माण झाला आहे.

विनय कोरे यांच्या या वक्तव्याने धनंजय महाडिक यांना सुद्धा थोडा वाव मिळाला. सतेज पाटील राजकारणाची नैतिकता पाळत नसल्याची टीका त्यांनी केली. ही निवडणूक जरी राजाराम कारखान्याची असली तरी आता चर्चा मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीची रंगली आहे…. विधान परिषद निवडणूक बिनविरोध करताना आमदार सतेज पाटील यांनी राजाराम कारखाना निवडणुक लढवणार नाही असं सांगितलं होतं. पण त्यांनी आपला शब्द पाळला नाही त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी विनय कोरे यांनी पुढाकार घेतला. आता सतेज पाटील विनय कोरे यांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलय.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…