

करवीर तालुक्यातील वाशी गावामध्ये छत्रपती राजर्षी सहकार आघाडीचे प्रचार सभा झाली. या सभेला खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी धनंजय महाडिक म्हणाले, आजवर कोल्हापूर जिल्हाने महाडिक कुटुंबांला भरभरून दिले आहे त्याचप्रमाणे महाडिक कुटुंबियांनीही कोल्हापूर जिल्ह्याच्या सेवेसाठी तीन पिढ्या दिल्या आहेत असे असताना देखील काही जण महाडिक बाहेरचे अशी टीका करतात. महाडिक कुटुंबीय कोल्हापूरच्या मदतीसाठी नेहमी तयार असते. बंटी पाटील तुमचे एक एक कारनामे बाहेर काढले तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला. आजची सभा म्हणजे आमच्या विजयाची मुहूर्तमेढ आहे असे धनंजय महाडिक म्हणाले.
जाहिरात
