बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते.यावेळी मात्र तिच्या नव्या घराचे काही सुंदर फोटोज सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.कंगनाने तिच्या नव्या पोस्टमधे चाहत्यांना तिच्या नव्या घराचा सुंदर लूक दाखवलेला दिसते. अभिनेत्री कंगनाने तिचे नवे घर मनालीमधे बांधलेले असून प्राचिन कला आणि परंपरेने या घराचे बांधकाम केलेले दिसून येते.हिमाचली पेंटिंग आणि विणकाम केलेल्या वस्तूंनी या घराला कंगणाने सजवलेले …