शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ शेतीपुरते मर्यादित न राहता उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, या दूरदृष्टीतून स्व. शामराव पाटील यड्रावकर यांनी ४५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटच्या वाटचालीने आज मोठे औद्योगिक रूप धारण केले आहे. यड्राव परिसरातील या औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात उद्योग कार्यरत असून, त्यातून परिसराच्या अर्थचक्राला मोठी चालना मिळत आहे. भविष्यात उद्योग उभारणीला चालना देऊन शिरोळ तालुक्याचा औद्योगिक …