Home वायरल कोरोनाचे महाराष्ट्रात पुनरागमन….

कोरोनाचे महाराष्ट्रात पुनरागमन….

3 second read
0
2
703

कोरोनाचा धोकादायक वेग, महाराष्ट्रात 700 हून अधिक नवीन रुग्ण सापडले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.. तर 12 वर्षाखालील मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे दिसत आहे. मुंबईत कोरोनाचे 221 नवे रुग्ण, तर दिल्ली येथे रविवारी २४ तासांत सुमारे कोरोनाचे ७०० रुग्ण आढळले आहेत व ४ मृत्युची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, नवीन प्रकरणांच्या आगमनाने महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 81,49,929 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे आणि एकूण 1,48,459 लोकांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना सतर्क राहण्यास आणि कोविड-19 व्यवस्थापनासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…