Home वायरल नव्या पिढीचा दुग्ध व्यवसायातील आदर्श प्रयोग – गोकुळच्या माध्यमातून हरियाणाहून आणलेल्या उच्च प्रतीच्या म्हैशींची पाहणी

नव्या पिढीचा दुग्ध व्यवसायातील आदर्श प्रयोग – गोकुळच्या माध्यमातून हरियाणाहून आणलेल्या उच्च प्रतीच्या म्हैशींची पाहणी

4 second read
0
0
348

–नविद मुश्रीफ

चेअरमन गोकुळ दूध संघ

कोल्हापूर, ता.२६ : “प्रगत गोठा, समृद्ध गोकुळ” ही या संकल्पनेतून गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी कुर (ता. भुदरगड) परिसरातील गोकुळ संलग्न प्रगतशील दूध उत्पादक, गोठा भेट कार्यक्रमाअंतर्गत उच्चशिक्षित असलेले दूध उत्पादक शेतकरी श्री. सौरभ कुलकर्णी व स्वानंद कुलकर्णी यांच्या गोठ्याला भेट दिली. यावेळी संघाचे अधिकारी, संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक उपस्थित होते.

      यावेळी मार्गदर्शन करताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ केवळ दूध संकलनापुरता मर्यादित न राहता, दूध उत्पादकांसाठी संघाच्या माध्यमातून विविध योजना राबवत आहे. मुक्त गोठा अनुदान, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान, वासरू संगोपन अनुदान,  फर्टीमिन प्लस सवलत योजना यांसारख्या उपक्रमांमुळे विशेषतः तरुणांनी या योजनांचा लाभ घेत दुग्ध व्यवसायाकडे वळावे, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आधुनिक गोठा, उत्तम व्यवस्थापन आणि गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनात योगदान द्यावे, असे आवाहन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले .

याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ,संचालक रणजितसिंह पाटील, विकास पाटील, बापुसो आरडे, डॉ.संदीप पाटील, उदय सोनडकर, संभाजी पाटील संघाचे अधिकारी व सुपरवायझर, कर्मचारी उपस्थित होते.


                    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…