Home Uncategorized महापुरामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत द्यावी – अमल महाडिक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी…

महापुरामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत द्यावी – अमल महाडिक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी…

5 second read
0
0
179

कोल्हापूर जिल्हयात जुलै २०२४ मधील अतिवृष्टीने आलेल्या महापूरामुळे झालेल्या नुकसानीचे २०१९-२० या सालाप्रमाणे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत करण्याची विनंती मा. आम. अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

कोल्हापूर जिल्हयात या महापूरामुळे शेतकऱ्यांच्या ऊस व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच व्यापार, उद्योग, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांच्या राहत्या घरांची पुराच्या पाण्यामुळे पडझड होवून नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना देखील जास्तीत-जास्त आर्थिक मदत होणे गरजेचे आहे.

या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना सन २०१९-२० मध्ये आलेल्या महापूरावेळी ज्याप्रमाणे पंचनामे झाले त्याचप्रमाणे याही वेळेस पंचनामे करून शासनामार्फत त्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करणे आवश्यक असल्याचे महाडिक यांनी मुख्यंत्र्यांची भेट घेऊन सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…