Home शैक्षणिक जी. एन. एम. अभ्यासक्रमामुळे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होईल: हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

जी. एन. एम. अभ्यासक्रमामुळे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होईल: हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

7 second read
0
1
903

कागल शहर प्रतिनिधी, राजु कचरे

कागल, दि. १४:कागल एज्युकेशन सोसायटीने जी. एन. एम. हा अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या शिक्षण संस्थेने विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांबरोबरच कागलमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करावे. त्यासाठी लागेल ते सहकार्य करू, असेही ते म्हणाले.

कागलमध्ये वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्यावतीने नव्याने सुरू केलेल्या जी. एन. एम. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कै. वाय. डी. माने -अण्णा यांनी प्रसंगी पदरमोड करून कागल एज्युकेशन सोसायटीचे रोपटे लावले आणि वाढविलेही. आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. मुलींचेही शिक्षण चांगले होईल या भावनेतूनच कै. अण्णांनी या संस्थेची उभारणी केली. या शिक्षण संस्थेने येत्या काळात बी. एस. सी.- नर्सिंग, एम.बी.बी.एस., एम. डी. हे अभ्यासक्रमही सुरू करावेत आणि स्वतःचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे.

गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील म्हणाले, कै. वाय. डी. माने -अण्णा यांनी सामाजिक परिवर्तनाच्या भूमिकेतूनच कागल एज्युकेशन संस्थेची स्थापना केली. त्यांना अपेक्षित असलेले कार्य ही शिक्षण संस्था निरंतरपणे करीत आली आहे.

प्रास्ताविकपर भाषणात कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, कै. वाय. डी. माने- अण्णा यांनी शिक्षणाकडे रोजगाराचं साधन म्हणून बघितले. अथक परिश्रम, अफाट जिद्द आणि त्यागातूनच त्यांनी कागल एज्युकेशन सोसायटीचे वैभव उभारले. कै. वाय. डी. अण्णांमुळेच कागलमध्ये नवोदय…..! भाषणात मंत्री मुश्रीफ म्हणाले, देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालयाची कल्पना पुढे आली. त्याकाळी कै. वाय. डी. माने -अण्णा यांनी स्वतःची इमारत सात वर्षे मोफत नवोदय विद्यालयाचा दिली. कै. वाय. डी. माने -अण्णांच्या असीम त्यागातूनच कागलमध्ये नवोदय विद्यालय साकारले आहे.

यावेळी कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, सुनील माने, दत्ता पाटील आदी उपस्थित होते. स्वागत बिपिन माने यांनी केले. सूत्रसंचालन सौ. हसीना मालदार यांनी केले. आभार संचालिका सौ. शिल्पा पाटील यांनी मानले. कागल: वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या जी. एन. एम. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचा प्रारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्थेचे सचिव प्रताप उर्फ भैया माने, युवराज पाटील, सुनील माने, बिपिन माने आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…