Home Kolhapur तरुणांनी उद्योग-व्यवसायातून स्वतःची प्रगती साधावी – नविद मुश्रीफ यांचे प्रतिपादन

तरुणांनी उद्योग-व्यवसायातून स्वतःची प्रगती साधावी – नविद मुश्रीफ यांचे प्रतिपादन

4 second read
0
1
716

कागल, ता.२९: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने व गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरी पत्र देण्यात आले.

यावेळी नविद मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा बँकेने अनेक सुशिक्षित बेरोजगारांना नवउद्योजक बनवण्याचे काम कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून करत आहे. अनेक कुटुंबे त्यामुळे आर्थिक सक्षम होऊन स्वबळावर उभी राहत आहेत. तरुणांनी उद्योग-व्यवसायातून स्वतःची प्रगती साधावी.

यादरम्यान अरुण नारायण जाधव – तमनाकवाडा, विजय रावसाहेब जाधव – बेलवळे खुर्द, मधुकर बच्चाराम पाटील – बेलवळे खुर्द, विठ्ठल आनंदा गिरी – बेलवळे बुद्रुक, सुखदेव बाळू पाटील – सावर्डे बुद्रुक व एकनाथ विष्णू पाटील – गोरंबे या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती दिनकर कोतेकर, बँकेचे विभागीय अधिकारी शंकर निंबाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…