Home आरोग्य बिद्री प्राथमिक आरोग्य केंद्राला पुरेसे मनुष्यबळ द्या…

बिद्री प्राथमिक आरोग्य केंद्राला पुरेसे मनुष्यबळ द्या…

3 second read
0
0
206

वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कागल प्रतिनिधी राजू कचरे

बिद्री ता. कागल येथे नव्याने निर्माण झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पुरेसे मनुष्यबळ द्या, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन डॉक्टर्स, परिचारक, परिचारिका व इतर मनुष्यबाळांच्या पद निर्मितीच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहांमध्ये मंत्री श्री. मुश्रीफ, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.

बैठकीतूनच आरोग्य विभागाचे सचिव दीपक म्हैसकर यांना फोन केला. बिद्री प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन डॉक्टर्स, परिचारक, परिचारीका आणि आवश्यक मनुष्यबळांची पदनिर्मिती करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आरोग्य विभागाचे उपायुक्त डाॅ. प्रेमचंद कांबळे यांना बिद्री ता. कागल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्याच्या व त्यासंबंधीचा अहवाल तातडीने आरोग्य मंत्रालयाला पाठविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे यांनी नवीन बिद्री प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन ॲम्बुलन्स, फर्निचर व आवश्यक साहित्याची मागणी केली.

या बैठकीला आरोग्य विभागाचे उपायुक्त डाॅ. प्रेमचंद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लांब आदी उपस्थित होते.

बिद्री ता. कागल येथे नव्याने झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मनुष्यबळाच्या नियोजनासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना समवेत बैठक घेतली. यावेळी, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रेमचंद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…