
ठाणे जिल्ह्यामध्ये पद्मविभूषण बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद येणार असल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित होते ठाण्यात राजकारणातील ग्रँड मास्टर आनंद दिघे हे आहेत असे यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुहाहटीला जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंड केले आणि त्यांची सत्ता उलथून टाकली. त्यावेळी जात एकनाथ शिंदे ही बुद्धिबळ खेळतानाचा फोटो देखील सोशल मीडिया वरती वायरल झाला होता. गेली अनेक वर्ष मला या राजकारणामध्ये चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण विरोधकांचे मात्र हे स्वप्न, स्वप्नच राहणार आहे. ते कधीही साकार होणार नाही गेल्यावर्षी आम्ही जी क्रांती केली त्यानंतर आम्हाला “राजकारणातले ग्रँडमास्टर” बोलतात. असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला. विरोधकांशी लढा द्यायचा असेल तर आम्हाला विरोधकांच्या खेळीने खेळणे गरजेचे आहे. बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे अडीच घरे चालणारे घोडे देखील राजकारणात आहेत. जनता सोबत असल्याचे विरोधक नेहमी चित्रपट होत आहेत, राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा असेल तर आम्हाला देखील बुद्धिबळ खेळणे फार गरजेचे आहे असे शिंदे म्हणाले.


