Home शैक्षणिक गोकुळ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांना अभिवादन…

गोकुळ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांना अभिवादन…

42 second read
0
0
291

कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राजर्षी छञपती शाहू महाराजांच्‍या १४९ व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते व संचालकसो यांच्‍या उपस्थितीत राजर्षी छ.शाहू महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

           या कार्यक्रम प्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, संस्थानिकांच्या वैभवात आणि विलासी जीवनामध्ये रममान न होता शाहू महाराजांनी सामाजिक दृष्ट्या खरी क्रांतीकारी पावले टाकली आणि समाज सुधारणा घडवून आणून त्यामध्ये ते कायम अग्रेसर राहिलेत  त्यांचे  विचार आणि कार्य याबद्दल जनता त्यांना कधी विसरू शकणार नाही. शाहू छत्रपतींचे हे विचार राष्ट्र घडणारे आहेत .छत्रपती शाहू महाराज हे आधुनिक कोल्हापूरचे जनक आहेत, त्यांच्या कारकिर्दीत कोल्हापूरच्या प्रगतीचे एक एक नवे पान लिहिले गेले. कला, क्रीडा, कृषी ,सहकार ,उद्योग आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रात त्यांचा लाखमोलाचे योगदान आहे. असे मनोगत व्यक्त केले .

बांधलेले रतयावेळी संघाचे पशुसंवर्धन विभागाचे व्‍यवस्‍थापक डॉ.यु.व्‍ही.मोगले यांनी प्रास्‍तावीक व संचालकाचे स्‍वागत केले व आभार .जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांनी मानले.

यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे,संचालक,अजित नरके ,शशिकांत पाटील (चुयेकर ) किसन चौगले, संभाजी पाटील,डॉ सुजित मिनचेकर ,बयाजी शेळके, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील,डेअरी मॅनेजर अनिल चौधरी,प्रशासन व्यवस्थापक डी के पाटील, अरविंद स्वामी, हिमांशू कापडिया, व्‍यवस्‍थापक पशुसंवर्धन डॉ.यु.व्‍ही.मोगले, संकलन व्यवस्थापक एस.व्‍ही. तुंरबेकर, सहा व्‍यवस्‍थापक पशुसंवर्धन डॉ.साळुंके संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

—–जाहिरात—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…