महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफसो यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दूध संघाच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात औषधी वनस्पतीचे वृक्षारोपन कार्यक्रम गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडला. याप्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील म्हणाले आमचे नेते आमदार हसन मुश्रीफ साहेब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेलं वरदानच म्हणावं लागेल. त्यांच्या आमदारकीची व मंत्रिपदाची २५ वर्षं म्हणजे विकासपर्वच आहे. …