Home शैक्षणिक ……. अन्यथा सात दिवसात महाविद्यालयाला टाळे ठोकू

……. अन्यथा सात दिवसात महाविद्यालयाला टाळे ठोकू

7 second read
0
0
73

मलकापूर

शाहूवाडी तालुक्यातील काही ठिकाणच्या महाविद्यालयात इस्लाम धर्मातील पोशाख (पडदा पद्धतीने) परिधान करून विद्यार्थिनी महाविद्यालयात येत असतात. या विरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू एकता व मलकापूर मधील हिंदूवादी संस्था- संघटना यांनी, शाहूवाडी तालुक्यातील ज्या महाविद्यालयात इस्लाम धर्मातील पोशाख परिधान करून विद्यार्थिनी येताना दिसतात आणि हे महाविद्यालयाच्या नियमांच्या विरुद्ध असूनही महाविद्यालय यावर कोणतीही कारवाई करताना दिसून आलेलं नाही. यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी हिंदू एकता महाराष्ट्र राज्या अध्यक्ष, भाजप महाराष्ट्र राज्य प्रदेशसचिव -विक्रम पावसकर, बजरंग दल- सुरेश रोकडे, महेश विभुते,चेतन गुजर यांनी महाविद्यालयांना योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आणि जर कारवाई ७ दिवसाच्या आत झाली नाही तर महाविद्यालयास टाळे ठोकू असे सांगण्यात आले.यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकार सेना जिल्हा उपाध्यक्ष -सतीश तांदळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष- अजय गुरव, माजी नगरसेविका -सोनिया शेंडे, प्रसाद कुलकर्णी, स्वरूप गांधी ,प्रदीप पवार, संदीप धनलोभे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…