Home वायरल तुकोबांच्या पालखी रथाला मुस्लिम बांधव चकाकी आणतात? जाणून घ्या काय आहे सत्य !

तुकोबांच्या पालखी रथाला मुस्लिम बांधव चकाकी आणतात? जाणून घ्या काय आहे सत्य !

4 second read
0
0
93

देहूत तुकोबांच्या पालखी रथाला चकाकी देण्याचं काम काही मुस्लिम कारागीर करत आहेत. जातीपातीच्या भिंती ओलांडून ते मोठ्या श्रद्धेने रथाला चकाकी आणतात. तीन- चार कारागीर हे पिंपरीतील घनश्याम गोल्ड ज्वेलर्स येथे काम करतात. रथाला चकाकी आणण्यासाठी काही केमिकल, लिंबू वापरण्यात येत अस कारागिरांनी सांगितलं आहे.

यावर्षी पायी पालखी सोहळा याची देही याची डोळा पाहण्यास मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनामूळ जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असे. परंतु, यावर्षी रुग्णसंख्या आटोक्यात असून कुठलेही निर्बंध नाहीत. पालखी सोहळ्याची लगबग सुरू असून चांदीच्या पालखी रथाला चकाकी देण्याचं काम सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम कारागीर मोठ्या श्रद्धेने रथाला पॉलिश करून चकाकी आणतात. त्यामुळं या पालखी सोहळ्यात हिंदू, मुस्लिम एकतेच दर्शन घडतं.

मुस्लिम कारागीर उमर अख्तार म्हणाले की, गेल्या सात वर्षांपासून संत तुकोबांच्या पालखी रथाला चकाकी देण्याचं काम करतोय. यामुळं एक वेगळाच आनंद मिळतो. आम्हाला हे काम करायला आवडत. हिंदू, मुस्लिम काही नाही..यातून एकतेचा संदेश द्यायचाय. माझे आजोबा पंढरपूर चे आहेत. अस उमर म्हणाला आहे. तर घनश्याम गोल्ड ज्वेलर्स चे मालक कुशल वर्मा म्हणाले की, रथाला चकाकी देण्याच्या माध्यमातून आम्हाला तुकोबांची सेवा करण्याचं भाग्य लाभतं. गेल्या काही वर्षांपासून सेवा सुरू आहे. करोना काळात देखील या सेवेचा आम्ही मुकलो नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…