Home राजकारण १०५ माजी नगरसेवकांचा संजय मंडलिकांना पाठिंबा

१०५ माजी नगरसेवकांचा संजय मंडलिकांना पाठिंबा

4 second read
0
0
2,165

१७ एप्रिल २०२४

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना कोल्हापूर शहरातील १०५ माजी नगरसेवकांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये बारा माजी महापौरांचाही समावेश आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, विद्यमान खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवकांची सोमवारी बैठक झाली. माजी नगरसेवक प्रा.जयंत पाटील, सत्यजित कदम यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन केले होते.

“१९९५ ते २०२० या कालावधीत विविध पक्षाकडून निवडून झालेल्या माजी नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील १०५ माजी नगरसेवकांच्या पाठिंबामुळे महायुतीचे उमेदवार मंडलिक यांना मोठे बळ मिळाले आहे. मंडलिक यांचा विजय निश्चित आहे.” असे खासदार महाडिक यांनी सांगितले.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मिळाला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी एक हजार कोटीचा निधी देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. त्या माध्यमातून शहरात विविध प्रकल्पांना गती येईल”.

यावेळी मंडलिक म्हणाले, “नगरसेवकांच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे होत असतात. महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासाला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन शहराचा आणखी विकास करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…