Home राजकारण मुख्यमंत्र्यांकडून प्रकाश आवाडेची मनधरणी ? परंतु आवाडे निवडणूक लढवण्यावर ठाम

मुख्यमंत्र्यांकडून प्रकाश आवाडेची मनधरणी ? परंतु आवाडे निवडणूक लढवण्यावर ठाम

3 second read
0
0
1,092

दि १३ एप्रिल २०२४

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कालच ताराराणी पक्षातून आपली उमेदवारी जाहीर केलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. या चर्चेत हातकणंगले मतदारसंघात आवाडे गटाचा पाठींबा मिळवण्यासाठी राजकिय तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यभरात हातकणंगले तालुका उमेदवारीच्या कारणास्तव गेले काही दिवस जास्त चर्चेत आहे. मुख्यत: राजू शेट्टी आणि धैर्यशील माने या पारंपारिक विरोधकांच्या लढतीमुळे संपुर्ण जिल्ह्यातील लोकांचे याठिकाणी लक्ष लागलेले होते, अशातच महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरूडकर यांनी शड्डू ठोकल्याने ही लढत रंगतदार झाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी केलेल्या दौऱ्यानंतर राजकिय चक्रे एका रात्रीत अधिकच गतीमान झाली. आणि दुसऱ्याच दिवशी इचलकरंजी विधानसभेचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रस्थापित उमेदवारांना आव्हान देत आपली उमेदवारी जाहीर करून खळबळ उडवून दिली.

हातकणंगले मतदारसंघात माने आणि आवाडे या गटाचं विळ्या भोपळ्याचं नातं असून माने याना महायुतीचं तिकीट मिळालं आहे. यापूर्वीच आवाडे गटाचे खासदार बदला… हि मागणी केल्यानंतर प्रकाश आवडे यांनी आपली उमेदवारी करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आवाडे गटाची मनधरणी करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आवाडे याची भेट घेतली असल्याचं राजकीय जाणकारांकडून समजत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…