Home राजकारण ए वाय पाटील यांच्याकडून लोकसभा निवडणुकीची भूमिका अखेर स्पष्ट…

ए वाय पाटील यांच्याकडून लोकसभा निवडणुकीची भूमिका अखेर स्पष्ट…

6 second read
0
0
2,312

दि १३ एप्रिल २०२४

मागील काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वावर नाराज असलेले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील भूमिका अखेर स्पष्ट केली आहे. रविवारी सकाळी राधानगरी भुदरगडमधील समर्थकांसह महारॅली काढून कोल्हापुरात नवीन राजवाड्यात छ. शाहूंची भेट घेऊन आपण त्यांना पाठिंबा देणार आहोत. परंतु मी राष्ट्रवादी सोडलेली नाही. केवळ लोकसभा निवडणुकीसाठी छ. शाहू महाराज यांना पाठिबा देत असल्याचे ए. वाय यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना उघड समर्थन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचे खास मित्र असलेले ए. वाय. पाटील लोकसभा निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घेणार याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता होती. गेल्या आठवड्यात ए. वाय. यांचे व्याही आणि भाजप नेते माजी आमदार सुरेश हाळवणकर, अरुणराव इंगवले, बाबा देसाई, प्रताप कोंडेकर यांनी बिद्री येथे ए. वाय. यांची भेट घेऊन महायुतीमध्ये सक्रिय होण्याची विनंती केली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी भूमिका जाहीर करेन, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
त्यामुळे महायुतीमध्ये नाराज असलेले ए . वाय यांना महाविकास आघाडीच्या तंबूत आणण्यास राष्ट्रीय काँग्रेसचे पी.एन पाटील आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शाहूवाडीच्या रणवीरसिह गायकवाड आणि ए. वाय. पाटील या जिल्हा बँकेतील राष्ट्रवादीच्या दोन संचालकांनी राष्ट्रवादीत राहूनच महाविकास आघाडीच्या उमेदवाराना पाठींबा देण्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…