Home राजकारण सांगलीची नाराजी हातकणंगलेमध्ये दाखवून देऊ

सांगलीची नाराजी हातकणंगलेमध्ये दाखवून देऊ

3 second read
0
0
1,477

दि १३ एप्रिल २०२४

हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या पंचरंगी चुरस होणार आहे. नुकतेच आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभेच्या मैदानात उडी घेतल्याने, मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. हातकणंगलेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांची मतदार संघात दौरे सुरू आहेत मात्र सांगली जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ‘सांगलीची नाराजी हातकणंगलेमध्ये दाखवून देवू अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असताना त्या ठिकाणी ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस गटामध्ये नाराजी आहे. या प्रकरणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांची समजूत काढणार का? की हातकणंगलेमध्ये त्याचे पडसाद उमटणार? हे पहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…