Home शेती लंम्पी संसर्गजन्य रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी, जनावरांच्या सुरक्षिततेसाठी गोकुळची वंध्यत्व निवारण शिबिरे व मोफत रूट सेवा तात्पुरते कालावधीसाठी बंद ठेवणार.

लंम्पी संसर्गजन्य रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी, जनावरांच्या सुरक्षिततेसाठी गोकुळची वंध्यत्व निवारण शिबिरे व मोफत रूट सेवा तात्पुरते कालावधीसाठी बंद ठेवणार.

6 second read
0
0
342

कोल्‍हापूर :ता.१६ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या कोल्हापूर (गोकुळ ) मार्फत जिल्ह्यातील गोकुळ संलग्न पशुसंवर्धन रूटवरती जनावरांचे वंध्यत्व निवारण शिबिरे राबली जात होती. संघ क्षेत्रातील सर्व दूध संस्थांना कळविण्यात येते की सध्या कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या भागात गाय वर्गीय जनावरामध्ये लंम्पी या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढलेला आहे.वंधत्व निवारण शिबिरा वेळी मोठ्या प्रमाणात जनावरे एकत्र येतात हा आजार प्रामुख्याने गाय/ वासरू/ बैल यांना होणार आजार आहे. अशावेळी एखादी बाधित जनावरे खोड्यावर आल्यास त्याचा इतर जनावरांना लागण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या संसर्गजन्य रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी, जनावरांच्या सुरक्षिततेसाठी संघाने लंम्पी आजाराची साथ कमी होईल तोपर्यंत संघामार्फत जिल्हात दिली जाणारी मोफत पशुवैध्यकीय रूट सेवा, वंध्यत्व निवारण शिबिरे दि. १६/०८/२०२३ पासून तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेंच लंम्पी बाधित जनावरचे औषध उपचार, अत्यावश्यक पशुवैद्यकीय सेवा जिल्हातील गोकुळ च्या सर्व पशुसंवर्धन सेंटर वरती चालू राहणार आहेत. तरी याबाबतची सूचना गोकुळ संलग्न सर्व दूध संस्थांनी आपल्या दूध उत्पादकांना देऊन संघास सहकार्य करावे. असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केली आहे. यासंबंधीची परिपत्रक प्राथमिक दूध संस्थांना पाठवणेत आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…